Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

भाग १: अशासनवाद म्हणजे काय?

आधुनिक सभ्यतेपुढे तीन प्रमुख आपत्तिजनक समस्या आहेत: १. सामाजिक पतन - गरिबी, बेघरता, गुन्हेगारी, सामाजिक विषमता, तेढ आणि एकाकीकरण, दारु आणि अमली पदार्थांचा अतिप्रयोग, अमानवीकरण, समाजातल्या सहकारी आणि स्वावलंबी व्यवस्थांचा ऱ्हास[१], जनतेचा  राजकारणातला निरस असे सगळेच सगळेच समाजिक प्रश्न यामधे येतात.  २. पृथ्वीवरच्या नाजूक पर्यावरणाचा नाश , ज्यावर सर्व प्रकारचे जीवजंतू अवलंबून आहेत.  ३. नरसंहार करणाऱ्या  शस्त्रांचा, विशेषतः आण्विक शस्त्रांचा प्रसार .  प्रस्थापित "तज्ज्ञ", काळोकाळ चालत आलेलं मत, मुख्य प्रवाहातली माध्यमे, राजकारणी, हे सगळेच या संकटांना वेगळं करता येण्यासारखं मानतात. या सगळ्या समस्यांची कारणं वेगवेगळी असून त्यांना एक एक करून सोडवता येऊ शकतं असं त्यांचं  मत आहे. पण या सगळ्याच समस्या अधिकाधिक वाईट होत चालल्या असल्यामुळे, हा परंपरागत दृष्टीकोन काम करत नाही हे स्पष्ट आहे. हा दृष्टिकोन सुधारला नाही तर येणाऱ्या काळात मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे. हा अनर्थ एकतर भयानक आण्विक युद्ध ,पर्यावरणाचा  प्रलयंकारी ऱ्हास  किंवा अमानुष नागरी यादवीच्या स्वरूपात येईल.
अशासनवादाबद्दल अनेकदा विचारले जाणारे प्रश्ण प्रस्तावना प्रारंभ भाग १ : अशासनवाद म्हणजे काय? भाग २:  अशासनवादी प्रचलित व्यवस्थेचा विरोध का करतात? भाग ३: भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल काय गैरसमज आहेत? भाग ४: भांडवलशाही अणि शासनवादाचा समाजावर कसा परिणाम होतो? भाग ५: अशासनवाद्यांच्या मते पर्यवरणाच्या समस्यांचे मूळ काय आहे ? भाग ६:  भांडवलशाही असरकारवाद हा अशासनवादाचाच एक प्रकार आहे का? भाग ७:  व्यक्तिवादी अशासनवाद भांडवलशाहीचे समर्थन करतो का? भाग ८:  अशासनवाद आणि भांडवलशाही असरकारवाद परिशिष्ट:  अशासनाची निशाणे परिशिष्ट: अशासनवाद आणि मार्क्सवाद परिशिष्ट: रशियन क्रांति साहित्य आणि इतर संदर्भ अनेकदा विचारले जाणारे प्रश्ण : दहा वर्षानंतर